Followers

Thursday, October 25, 2007

सरळसोट... रोख-ठोक....


कधि मना मधे विचार येतो आपण पण इतर ब्लॉगणारया लोकान्प्रमाणे, अगदि मोठ्या फ़िलॉसॉफर सारखा काहितरी जड जड मोठे शब्द लिहुन इतराना स्तंभित कराव. पण लगेच मी अक्षरश: फ़ुटतो. लोक सीरियस कसे होतात मला काहि समजत नाहि बुवा, आणि जमत तर अजिबात नाहि. काहि लोक ना अगदि कसल्याहि गोष्टि मधे सीरियस होतात.

आता हेच बघा, अता तुम्हाला कोणि विचारल कि तुम्हाला संगीत आवडत का? आवडल तर कोणत? तर तुम्ही आम्ही काय उत्तर द्याल? "हो आवडत, मला अमुक तमुक संगीत आवडत" , मग ते कर्नाटक असो, अभिजात असो, सुगम असो, भावगीत असो किन्वा मग अगदी रॉक असो, जाझ असो, रेगे असो किन्वा हिपहॉप असो. काहि तरि संगीताच प्रकार आपल्याला अभिप्रेत असतो. मी हाच प्रश्न मी एका व्यक्ति ला विचारला आणि पुढच्या क्षणि ठार आडवा झालो. चेहरया वरिल माशी पण उडणार नाहि याचि काळजि घेत त्या व्यक्ति कडुन उत्तर आल... "संगीताला भाषा नाही.. धर्म नाही ना जात.... आहे ते फ़क्त निःशब्द असा भाव आणि भावनांचा कल्लोळ...एक अत्मीक समाधान..." (गर्रर्रर्रर्रर.....धप्प्प... हा मझ्या पडण्याचा आवाज होता.) आई ग, किती हे वजनदार वाक्य येवुन पडल हे अंगावर? कुठुन दुर्बुद्धि झाली नी विचरला हा प्रश्न मी ?

तर काहि लोक हे असे असतात. सरळसोट, रोखठोक आयुष्य याना मान्य नाही. साधि सोप्पि गोष्ट पण इतकी गुन्तागुन्तीची करुन टाकतात कि त्यात आयुष्यातील सरळ सोपे पणा कुठे तरि हरपुन जावा. आयुष्य हे सुन्दर आहे... ते सरळ पण असाव. विनाकारण जाड जुड शब्दान च्या जन्जाळा मधे अडकुन त्याला किचकट करण्यात काय अर्थ ? पु.ल. म्हणतात तस आपल्या मध्यमवर्गिय लोकान्च्या जगण्याला "ज़ीवन" म्हणाव अस काही भारदस्त ते नसत. मग किमान ते जगण सरळ आणि रोखठोख तरी असु द्या ना. Life is beutiful....Let's make it Simple too.

Wednesday, October 24, 2007

मला पण ब्लॉगायच आहे........

मला पण बोलायच आहे......
हुश्श्श्श..... झाला एकदाचा ब्लोग तयार. खर तर या ब्लॉग च नाव "मला पण बोलायच आहे" अस असण्या पेक्षा "मला पण ब्लॉगायच आहे" हे असण अधिक संयुक्तिक ठरेल अस मला आपल वाटत. त्याच काय आहे, आज काल काय जो कोणी उठतो तो ब्लॉग लिहायल बसतो. उठला कि लिहिला ब्लॉग, बसला कि लिहिला ब्लॉग, काहि काहि विचारु नका. आता मलाच पहा ना, काहि गरज आहे का काही लिहिण्याची? पण नाहि, लिहायल बसलोय. तुम्हाला सान्गतो, लोक ना, जिलब्या पाडाव्या ना तसे ब्लॉग पाडतात, सॉरी,सॉरी, लिहितात.

आता तुम्हाला म्हणुन सागतो, ब्लॉग लिहायला घेतला आहे खरा पण काय लिहायच काय हा मोठा प्रश्न मला पडला आहे. चला सुचेल तेव्हा सुचेल, एक सुरवात तर झाली...... आता मी पण ब्लॉगणार.