
कालच बाळासाहेब म्हणाले, शिवसेना अस्वला सारखी आहे. काही केस गळून पडले तर शिवसेनेला फ़रक पडणार नाही. आता केस गळून पडलेले हे शिवसेना रुपी अस्वल नक्की कस दिसेल हा एक विचार मनाला चाटून गेला. आणि तेवढ्यात हे चित्र माझ्या डोळ्या समोर आले. या छायाचित्रा चा जो कोणी छायाचित्रकार असेल त्याच मी मना पासून आभारी आहे बुआ. मा. बाळासाहेबाना सत्याची जाणीव करुन देण्यास हे चित्र पुरेसे आहे...
बाळासाहेब, खुप उशीर झाला आहे, पण.... अजुनही हातातुन वेळ मात्र गेलेली नाही. या अस्वलाच्या अंगावर पून्हा केस उगवलेले पाहण्यास आम्ही आतूर आहोत, तशी आमची मनोमन इच्छा सुद्धा आहे. तूटलेल मराठी मन, तुम्ही प्रयत्न केलात तर पून्हा एकसंघ होईल. तस होण गरजेच आहे. नाहीतर आपला लोण्याच्या गोळ्यावर ही माकडे ताव मारतील. आणि आपल्याच राज्यात आपण भुकेले राहू. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ही तर संत वाणी आहे. महाराष्ट्रातील मराठी हिन्दुना देशोधडीला लावून हिन्दुस्थानाच्या तमाम हिन्दुन्चे भले साधणार तरी कसे ?
..आणि त्यातुनही जरी हिन्दुत्वाच्या भल्या साठी एक वेळ आम्ही 'मराठी' चा मुद्दा बाजूला ठेवला तरी, जो इथल्या हिन्दून्च भलं नाही करु शकला तो हिन्दूस्थानातील तमाम हिन्दून्चे भले ते काय करणार. असा प्रश्न किन्वा शंका आमच्या मनात आल्यास ते गैर आहे काय? तेव्हा साहेब, आजूबाजू चे बडवे काय म्हणताहेत या पेक्षा तुम्ही काय म्हणाल त्याला मराठी माणूस किम्मत देतो हे विसरु नका. 'मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला' अस विधान बाळासाहेब करुच शकत नाहीत, हा जो विश्वास तुमच्यावर आहे तसा विश्वास जनता कोणत्याही नेत्यावर दाखवत नाही. तुमच्या जवळ हा जनतेच्या विश्वासाचा खजीना आहे. त्याचा पुरेपूर वापर करा. या महाराष्ट्राचा , मराठीचा होणारा र्हास दूहीने थाम्बणार नाही. तेव्हा अजुनही तुटलेली मने सान्धण्याची. वेळ गेलेली नाहिये. ... या अस्वलाचे गेलेले केस फ़क्त तुम्हीच परत आणू शकता.... नाहीतर केसान्चे काय आहे....ते अस्वलाचे काय माणसाचे काय निगा नाही राखली तर ते जाणारच.....