Followers

Saturday, November 7, 2009

बाळासाहेब, टक्कल अस्वलालापण पडतं म्हटल.


कालच बाळासाहेब म्हणाले, शिवसेना अस्वला सारखी आहे. काही केस गळून पडले तर शिवसेनेला फ़रक पडणार नाही. आता केस गळून पडलेले हे शिवसेना रुपी अस्वल नक्की कस दिसेल हा एक विचार मनाला चाटून गेला. आणि तेवढ्यात हे चित्र माझ्या डोळ्या समोर आले. या छायाचित्रा चा जो कोणी छायाचित्रकार असेल त्याच मी मना पासून आभारी आहे बुआ. मा. बाळासाहेबाना सत्याची जाणीव करुन देण्यास हे चित्र पुरेसे आहे...
बाळासाहेब
, खुप उशीर झाला आहे, पण.... अजुनही हातातुन वेळ मात्र गेलेली नाही. या अस्वलाच्या अंगावर पून्हा केस उगवलेले पाहण्यास आम्ही आतूर आहोत, तशी आमची मनोमन इच्छा सुद्धा आहे. तूटलेल मराठी मन, तुम्ही प्रयत्न केलात तर पून्हा एकसंघ होईल. तस होण गरजेच आहे. नाहीतर आपला लोण्याच्या गोळ्यावर ही माकडे ताव मारतील. आणि आपल्याच राज्यात आपण भुकेले राहू. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ही तर संत वाणी आहे. महाराष्ट्रातील मराठी हिन्दुना देशोधडीला लावून हिन्दुस्थानाच्या तमाम हिन्दुन्चे भले साधणार तरी कसे ?

..आणि त्यातुनही जरी हिन्दुत्वाच्या भल्या साठी एक वेळ आम्ही 'मराठी' चा मुद्दा बाजूला ठेवला तरी, जो इथल्या हिन्दून्च भलं नाही करु शकला तो हिन्दूस्थानातील तमाम हिन्दून्चे भले ते काय करणार. असा प्रश्न किन्वा शंका आमच्या मनात आल्यास ते गैर आहे काय? तेव्हा साहेब, आजूबाजू चे बडवे काय म्हणताहेत या पेक्षा तुम्ही काय म्हणाल त्याला मराठी माणूस किम्मत देतो हे विसरु नका. 'मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला' अस विधान बाळासाहेब करुच शकत नाहीत, हा जो विश्वास तुमच्यावर आहे तसा विश्वास जनता कोणत्याही नेत्यावर दाखवत नाही. तुमच्या जवळ हा जनतेच्या विश्वासाचा खजीना आहे. त्याचा पुरेपूर वापर करा. या महाराष्ट्राचा , मराठीचा होणारा र्‍हास दूहीने थाम्बणार नाही. तेव्हा अजुनही तुटलेली मने सान्धण्याची. वेळ गेलेली नाहिये. ... या अस्वलाचे गेलेले केस फ़क्त तुम्हीच परत आणू शकता.... नाहीतर केसान्चे काय आहे....ते अस्वलाचे काय माणसाचे काय निगा नाही राखली तर ते जाणारच.....

10 comments:

दिनेश जगन्नाथ सुर्वे said...

jhakkas ............. kadak answer

waah waah aprateem

Mahendra Kulkarni said...

Excellent :)

सिद्धार्थ said...

>> अस्वलाच्या अंगावर पून्हा केस उगवलेले पाहण्यास आम्ही आतूर आहोत.

अनुमोदन.

Mahendra Kulkarni said...

अस्वलाच्या अंगावरची कातडी गेंड्याच्या सारखी झालेली दिसते आहे.. कांही फरक पडत नाही त्यांना..तुम्ही कांहीही म्हणा..

Mahendra Kulkarni said...

तुम्ही इथे फक्त ब्लॉगर्स चा ब्लॉग असणाऱ्यांनाच कॉमेंट देण्याची परवानगी दिलेली आहे कां?? त्या मुळे ज्या कोणाचे ब्लॉग्ज वर्ड प्रेस वर असतिल तर त्यांना कॉमेंट्स पोस्ट करता येत नाही.

Unknown said...

very nice.....

cinemaworld of santosh said...

dear sunil
tuzyatala lekhak motha hou de.
santosh

Unknown said...

sunil ha jar tujha lekh bala sahebani vachala asta tar nakki kahi tari badal jhala asta.

स्वराज..! said...

प्रत्येक मराठी माणसासाठी जसे महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा ..हे जसा सत्य आहे...त्याचा प्रमाणे मराठी माणूस आणि बाळासाहेब हे नात आपण मान्य करायला पाहिजे.

वाघ कितीही म्हातारा झाला तरी त्याची एक डरकाळी अंगावर शहारे आणणारी असते....पुन्हा आम्ही ती डरकाळी ऐकण्यासाठी आतुर आहोत.....

Sneha said...

hmm. tyanch gandhinchya tin makadansarakh jhal aahe are... fakt tya makadanchya tatwat thoda badal jhalay...