Followers

Friday, February 29, 2008

पिल्लु


लाल्या गेला. दुडु दुडु धावणारा, सिन्हाच्या बछड्याला लाजवेल अशा रुबाबात वावरणारा, आपल्या बाल श्वान लीलान्नी मलाच नव्हे तर आजुबाजुच्या तीन ईमारतीन्मधिल लोकाना मोहुन टाकणार, लाल्या... केवल ३० सेकन्दात निष्प्राण कलेवर होउन माझ्याच हातत विसवल. त्याची अन्धुक होत जणारी ह्रुदयाची धडधड, त्याचे मंद होत जणारे श्वास, आणि मझ्या तळहातावर असहाय शेवटचे आचके देणारे त्याचे शरीर मला क्षणा क्षणाला असहायतेच्या खोल गर्तेत भिरकावुन देत होते. मी काहिच करु शकत नव्हतो.... अगदि कहिच. माझ्या पत्नीने धावत जऊन आणलेले पाणि त्याच्या उघड्या जबड्या मधे सोडल आणि क्षणात लाल्याची क्षीण होत चाललेली धुग धुग शान्त झाली...लाल्या गेला.

सोसयटिच्या थंड लोखन्डी गेट ला पाठ टेकवुन कधि लाल्या कडे तर कधि ओक्सबोक्शि रडणारया मझ्या पत्नी कडे मी असहायपणे पहात होतो. आपल्याच बोटानी लाल्याचे निष्प्राण पंजाना आणि शेपटीला हलवुन ती पुन्हा पुन्हा मला समजावत होती "तो बघ अजुन शेपुट हलवतोय... पाय हलवतोय ... चल रे डॉक्टर कडे जाऊया असेच त्याल घेऊन..." तिला कस समाजावु, नियतिने तेवढा सुद्धा वेळ नाही दिला मला ? .... ३० सेकन्दात २ महिन्यचा निष्पाप जीव हे जग सोडुन निघुन गेला. नविन मिळलेल्या जगाच्य आणि जगण्याच नविन्य पहात बागडणारा एक जीव, उन्मत्त, बेदरकार आणि बेजबाबदार स्रीमन्ती च्या नी गुर्मी च्या चाका खाली चिरडुन गेला. लाल्या तस मझे पाळिव पिल्लु नव्हते, पन क कोन जणे मझ काळिज तो पुरत पिळवटुन गेलाय. जाताना काळजाला चटका लावुन गेला.

मस्त रविवारची सकाळ अंथरुणात आळश्या सरखे पडुन राहुन साजरी करायची असा विचार करत असतानाच कानावर कुत्रीच्या पिल्लान्च्या "कुइई कुइई" चा कोलाहाल कानी पडला आणि, जगातील सगळ्या निष्पाप जीवान्च्या रक्षणाची जबाबदारी आपलिच आहे, अस मानुन चालणारी, माझी अर्धान्गिनी सुसाट बाल्कनी कडे पळालि. ती परत आली तिच मुळी उड्या मारत. "अरे 'काळी' ने पिल्ले दिलि आहेत, ये न इकडे , पहाना..." जवल जवल अंथरुणातुन खेचतच तिने मल बाल्कनीत आणले. डोळे चोळत, डोळ्यावरची साखर झोप उडवण्याच प्रयत्न करत मी खाली पाहु लगलो. 'काळी' आपल्या जबड्यान्मधे छोटि छोटि पिल्ले नाजुकपणे धरुन रस्त्या शेजारील वापरात नसलेल्या गटाराच्या झडपेच्या खाली आणुन ठेवत होती. ते द्रुश्य पाहुन मझी झोप कुठच्या कुठे पळाली. "याहू.... नविन पिल्ले .. हे टकारा टकारा ... हे टकारा टकारा ... " अम्ही दोघानी अगदी लहान होउन उड्या माराल्या.
माझ्या अर्धन्गिनी मधे काय अजब गोष्ट आहे ते समजत नाहि, पण कोणत्याही मूक प्राण्या बरोबर संवाद साधण्याची कला मुक्त हस्ते देवाने तिला बहाल केली आहे. चेन्नैई च्या राष्ट्रिय उद्यानात फ़िरताना मला याची पुरे पुर प्रचिती आली आहे. तेथिल एमु पासुन मोरा पर्यन्त आणि साम्भरा पासुन हरणान्च्या पाडसान पर्यन्त सगळे प्राणी जस तिच बोलण समजुन तिच्याशी संवाद साधत असावेत अशा प्रकारे तिच्या सुचने प्रमणे वागत होते. ते पाहुन मला तिच्या या कलेची माहिती झाली. मी पण ती कला हळु हळु आत्मसात करतोय. शेवटि 'माया' हे त्या भाषे चे शब्द आणि 'ममता' हेच त्या भाषेचे व्याकरण, हे गुपित मला प्रत्यक्ष पहिल तेव्हा उमजल

असो, रोजच्या धकाधकीत 'काळी' ची पिल्ल आमच्या डोक्यातुन निघुन गेली. शिवाय ती पिल्ले तिथे असल्याचा मागमुस सुद्धा नव्हता. कुत्री सुद्धा मान्जरा सारखी आपली पिल्ले ९ ठिकाणी फ़िरवत असेल, आता ती त्याना घेऊन दुसरया जागी गेली असेल अशी अम्ही आपली एक खुळी समजुत करुन घेतली. एके रात्रि जेवणा नंतर शतपावलि करुन परत येतना आमच्या मागे कोणीतरि येतय अस वाटल म्हणुन मागे वळून पाहिल तर शेपटि हलवत आणि नाक फ़ेन्दारत 'काळी' अमच्या मागे मागे येतना दिसलि. आम्हि थाम्बलो. "काय काळे, तुझी पिल्ल कुठे आहेत ग?" मझ्या पत्नी ने तिच्या डोक्यावरुन हात फ़िरवत विचारल. काळी चि कळी खुललि. शेपुट जोरजोरात हलवत ती माघारी फ़िरली नी आमच्या कडे पाहत चालू लागली. जशि काहि ती म्हणत असावी, "या माझ्याबरोबर". आम्ही तिच्या मागो माग निघालो. गटाराच्य झडपे च्या आत डोकावत काळी लडाने "कुइई, कुइई" अस अवाज़ करु लगलि. "ओह माय गॉड. ती पिल्ले इथेच आहेत... " माझी पत्नी ओरडलीच. "अग ते सोड... काळी ल आपली भाषा समजते..." आम्ही फ़क्त नाचायचेच बाकि होतो. समोरच्या दुकानातील व्रुद्ध दुकान्दार काका हा सगळा प्रकार पहात होते. त्यान्चा चेहरा पण आनन्दाने उजळलेला दिसला. काळी ची पिल्ले गटाराच्या 'बंकर' मधे अगदि सुरक्षित होती. पण काळी च्य पोटा पण्याच काय? उरल सुरल अन्न दारा बहेरिल कुत्र्याच्या पुढ्यात टाकण्याची आमची 'भारतिय संस्कृति' कधीच ईतिहासजमा झलि आहे. आज काल उरलेल अन्न प्लास्टिक च्या पिशवित बान्धुन कचराकुन्डित टकण्यात लोकान्चा अधिक कल असतो. आम्हि घरातिल उरलेल अन्न आणि ते नसेल तर बिस्किटे काळी ला रोज देऊ लगलो. भटकी असुन पण समजदार असलेलि काळी आपल्य 'बॉडी लान्ग्वेज' च्या द्वारे आमचे ऋण मानु लागलि.

गेला महिना भर झाल असेल, काळीची पिल्ले हळु हळु 'बंकर' मधुन हलकेच बहेर येऊ लागलि. पण विलक्षण भित्रि. जवळ जाताच पुन्हा आत पळुन जात आणि टुक टुक पाहत रहत. त्यान्च्या सगळ्याच अदा मोहक. या पिल्लान्च्या लीला पाहणे हे किती मोहक असते म्हणुन सान्गू ? भारतिय सैन्य दलात जम्मु - काश्मिर सिमेवर तैनात असलेला माझा मित्र मेजर अमरदीप ला मी सहज विचरल. " अरे कक्के, १३००० फ़ुटावर चौफ़ेर पसरलेल्या बर्फ़ात तु 'स्ट्रेस मेनेजमेन्ट' कस काय करतो बुवा ? हाडे फ़ोडणारया ठन्डित तुल काम करायला कय मोटिव्हेट करत ते तरी सान्ग." त्याने दुसरया दिवशिच आपल्या 'ऑर्कुट' प्रोफ़ाईल मधे काहि पिल्लान्चे फ़ोटो लावले. फोटो मधे तो मेजर आपल्या युनिट मधिल ईतर सैनिकान सोबत एका कुत्री नी तिच्या इटुकल्या पिटुकल्या पिल्लान बरोबर लहान मुला सरखा खेळतना दिसत होते. त्याने मला मेसेज पण लिहिला..."ये है मेरा मोटिवेशन, ये है मेरा 'स्ट्रेस मेनेजमेन्ट' . १३००० फ़िट पे चारो और जहान बरफ़ कि सफ़ेदि के अलवा कुछ नही होता, कहा से गोली आकर सीना पार कर देगी मालूम नहि होता, दिन भर के काम के बाद थक कर हम केम्प पे लौट आते है तो ये 'फ़रिश्ते' हमारी थकान दुर कर देते है. जहान हम सान्से लेने को तरसते है, वहा ये हमरे सान्सो मे जान डाल देते हैन." त्याच बोलण तन्तोतन्त खर आहे.

दिवस भर एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकानि पसरलेल्या मझ्या ऑफ़िसच कामकाज सम्भाळताना, कॉन्फ़रन्स मधिल डोके पिकवणरया बैठकिना हजेरि लवल्या नन्तर, सीस्टीम मधिल अनपेक्षित पणे उभे रहिलेले किचकट प्रॉब्लेम ला तोन्ड देऊन आणि त्यावर उपाय शोधुन, जनावरा सारखे माणसे कोम्बलेल्या ट्रेन मधे एका अन्गठ्यावर उभ राहुन प्रवास करुन जेव्हा थकुन भागुन मी घरी परततो तेव्हा क्षणात ताजा तवाना होण्यच एकमेव ऊपाय म्हणजे ...'पिल्ले'...जगतील सर-सकट सगळि उत्साहवर्धक पेये, नि डाबर, गोबर चे उत्साहवर्धक सगळि च्यवन्प्राश या "राम-बाण" उपाया समोर 'झक' मारतात. 'काळी' च्या पिल्लान्च्या त्या 'उचापती' तासन तास पाहतना अमची हसुन हसुन मुरकून्डी वळत असे. आणि थकवा कुठच्या कुठे पळुन जात असे. फ़क्त हातात एक कॉफ़ी चा कप आणि गुटाराच्या झडपे च्या रन्गमन्चावर चाललेला या पिल्लन्च्या लीलान्चे नाट्य... बास अजुन काय हवे? या नाट्याला पिल्लान्च्या कृतीस अनुसरुन दिलेले संवाद मात्र आमचे असत.

'काळी' ल एकुण ७ पिल्ले, आम्ही त्याना त्यान्च्या शरीरगुणविषेशा प्रमाणे नावे देऊन मोकळे झालो. काळा पान्ढरा रन्ग असलेला, थोराड तो "काळुबाळु", त्याच्या सरखच काळा पान्ढरा पण काळ्याच्य जागी पान्ढरे आणि पान्ढरया च्या जागी काळे स्पॉट असणरा तो "बाळुकाळु", मोठे दोळ्यावर येणारे दाट केस असलेल तो "झिप्रा", डॉबरमन सरखा रंग असलेला तो "डॉब्बी", चमकदार कॉफ़ी रन्गाच्य केसान्चा "ब्लाकि", एकदम कृश, सतत आपलल्या भावान्चा मार खाणारी पण नाजुक गोड दिसणारी ती "क्युटि". आणि गुबगुबित, रुबाबदार,सिन्हाच्या बछड्या सरख दिमाखदार, सिन्हा सारखाच रंग पण जरा लालसर झाक असलेल तो आमचा सगळ्यान्चा लाडका "लाल्या". ख़रतर 'लायन किन्ग' मधिल "सिम्बा" ची ती प्रतिकृती वाटत असल्या मुळे याल "सिम्बा" म्हणुया असा मी तगादा लवला होता. पण मी मझ्या बहिणीला भेट दिलेल्या कुत्र्या च नाव पण 'सिम्बा' असल्या मुळे मला माघार घ्यावी लागली. त्याला 'ब्राउनी' म्हणु अस पण मी सुचवल, पण लगेच आमच्या अर्धन्गिनीने मझ्या कडे पाहुन डोळे वटारले. होय, तिने चेन्नाई सोडुन मुम्बैई ची वाट धरल्या बरोबर तिच्या 'ब्राउनी' महशयानि अन्नास कायमचा राम राम केला नी असहकर आन्दोलन पुकरले ते अगदी स्वर्गात प्रवेश करे पर्यन्त. "माझा 'ब्राउनी' एकमेव होता, दुसरा कोणिही त्याची जागा नाही घेऊ शकणार" अस शेरा मारुन "ब्राउनी'" हे नाव बाद झाल. मग एके दिवशि तो खेळत असताना अचनक तोन्डुन नाव आल, 'लाल्या'. 'लाल्या' खुप लाडक नी गोन्डस नाव त्याल एकदम "फ़िट" होत.
लाल्या ला जवळुन पहुन स्पर्श करण्याची अनावर ओढ खर तर आम्हा दोघान्मधे होती. पण जास्त जवळिक नको, एकदा लळा लागला की सुटता सुटत नाही हा आमचा दोघान्चा ही पुर्वानुभव आहे. म्हणुन आम्ही दोघ पण ती गोष्ट टाळत असु. पण मग एके दिवशी मात्र रहावल नाहि. आज 'लाल्या' ल हाथ लावयचाच. आम्हि सरळ खालि गेलो पण काळी समोरच थाम्बली होती. कितीहि ओळख असली तरिहि तिच्या मनाचा अन्दाज घेणे महत्वाचे होते. आम्हि एक बिस्किटचा पुडा घेतला नी काळी कडे वळलो. आम्हाला पाहुन काळी खुश झलि हे तिच्या जोरजोरात हलणरया शेपटि ने सन्गितल. आम्ही तीला बिस्किट भरवलि, ति बिस्किट खात असतानाच लाल्या बाहेर येऊन आमच्या कडे टुक टुक पाहु लागला. मग मी मला रोखु शकलो नाही, काळी च्या पाठि वरुन फ़िरवलेला हात मी हलकेच लाल्याच्या नाका जवळुन त्याच्या डोक्यावर ठेवला. लाल्या ने माझी बोटे हुन्गली, आणि तो पण शेपटी हलवु लागला. मैत्री चा स्विकार झाला होता. लाल्या माझा तळवा नी बोटे चाटत होता. मी हलकेच त्याच्या पोटा खालून हाथ घलुन त्याल जवळ उचलुन घेतले. हे सगळे करतान माझी एक नजर काळीवर स्थीर होती. पण काळीची नजर शान्त होती, या प्राण्यान पासुन माझ्या पिल्लाना काहिच धोका नाही अशी तीची खात्री असावि. माझ्या पत्नी ने काळीच्या डोक्यावर हात ठेवुन विचारल "काय ग बाई, थोडा वेळ नेउ का याला मझ्या कडे?" काळी ने नाकाची फ़ुरफ़ुर केली. मी लाल्या ला तिच्या तोन्डा समोर पकडल आणि तिच्या परवानगिची वाट पाहु लागलो. काळी ने डोळे किलकिले केले, नाक थोड फ़ेन्दारुन लाल्याच तोन्ड चाटल नी तिने आमच्या कडे पाठ फ़िरवलि. परवानगी मिलाळी होती. काळी च्या समजुतदार पणा कडे आम्हि थक्क होउन पहात राहिलो. लाल्याला छातीशि कवटाळून घेऊन येतान तो मधेच डोके उचलुन माझी हनुवट चाटण्याचा प्रयत्न करत होता. लवकरच लाल्या आमच्या दिवाणखन्यात बागडु लागला.
जेव्हा जेव्हा अम्हाला कन्टाळा येई, वातवरणातील ताण तणाव वाढत तेव्हा तेव्हा आम्हि लाल्या ला घरी आणत असु. थोडावेळ त्याचे ते बागडणे पाहिले की सगळे ताण तणाव कुठच्या कुठे दुर पळत. न चुकता आम्ही लाल्या ला परत त्याच्या जागी ठेवुन येत असू. लाल्या म्हणजे एक अजब रसायन, लाल्या म्हणजे उत्साहाचा झरा. खास त्याच्या साठी असलेल भान्ड भरुन दूध प्यायला कि स्वारि खुष... मग काय विचरता, रन्गात येऊन असा काहि धूमकुळ घालायच कि आमची हसता हसता पुरेवाट होत असे. एके दिवशि धुळिने माखलेल्या लाल्या ला अन्घोळ घातली. थरथरणारा लाल्या इकडे तिकडे सैरा वैरा पळु लागल. मग दूध पीउन झाल आणि स्वारी खेळाव कि डूलकी काढावि या द्विधा मनस्थितित खेळु लगलि. पण कसल काय, डोळ्यावरिल अनावर झोप काही थाम्बेना तेव्हा उभ्या उभ्याच लाल्या डूलक्या काढु लागला आणि तोल जाऊन पडला तो गाढ झोपिच गेला. त्याच्या या 'उपद्व्यापानी' आम्ही पोट धरुन हसत असु. लाल्याच्या या सगळ्या प्रतापा मुळे बच्चे कम्पनि मधे तो प्रिय न झाला तरच नवल. अजुन पर्यन्त आम्हा दोघना काळी आणि पिल्ला बरोबर बोलताना पाहुन आमच्या कडे "वेडे आहेत कि काय?" अश भवनेने पाहणारे लोकच आता बिस्किटे, पाणी तत्सम पदर्थ त्याना देऊ लागले. काळी आणि तिची पिल्ले आजु बाजु च्या ३ ईमारति मधिल रहिवाशान्च्या कौतुकाच विषय बनु लागले.
लाल्याचे निष्प्राण कलेवर तळहातावर घेऊन मी उभ होतो. सगळे प्रसन्ग माझ्या डोळ्या समोरुन सरकत होते. खरतर ज्या दिवसा पसुन लाल्या उडी मारुन बाहेर येऊ लगला त्याच दिवशि माझ्या मनात भिति डोकावली होती. ती भिति खरी होइल आणि तेहि इतक्या लवकर खरी होईल अस मात्र वाटल नव्हत. काल नेहमी प्रमाणे जेव्हा शतपावली करुन आम्ही परतलो, तेव्हा काळी सगळ्या पिल्लान्च्या जवळ झोपलि होती. अम्हाल पाहुन ति पुन्हा कोलहाल करु नये म्हणुन आम्ही गुपचुप सोसायटिच्या आवारात शिरलो. अम्ही वर येऊन पाहतो तो काळी दिसेनाशी झली होती, आणि सगळि पिल्ले बगडायल लागली होती. सगळेच रस्त्यावर खेळत होते...तशी अताशी रोजच पिल्ले रस्त्यवर खेळत होति. सगळ्यात धिट लाल्याला दुर दुर भटकण्यात कोण मजा वाटे. आजहि तो तसाच सगळ्यानच्या पुढे होता... बिचरया निष्पाप जिवाला काय ठाऊक कि वळणावरुन येणरी गाडी च्या खिजगणतित सुद्धा तो नाहि. बाल्कनी मधुन आम्ही दोघ जीवच्या अकान्ताने ओरडत होतो "लाल्या..बाजु हो रे...!!!" पण...त्याला तेवढा अवधी पण न देता लाल्याला चिरडुन काहि झालच नाहि अशा निर्विकार पणे गाडी निघुन गेली आणि मी ड्रायव्हर च्या नावे, माझ्या शिव्याकोषातील असतिल नसतिल तेवढ्या शिव्यान्ची लखोलि वहात जिन्या कडे पळालो. ५ सेकन्द पण नसतिल लागली मला रस्त्यावर पोहोचण्यास....पण लाल्या क्षिण पणे आचके देत होत... ना कसला आवाज़, ना धड्पड.... सगळ संपल होत.... त्याच्या उघड्या जबड्यातुन रक्ताचि एक धार लागलि होती. जीवाच्या आकन्ताने मी ओरडत होतो, "लाल्या उठ रे लाल्या..." पण लाल्या शेवटचे आचके देत होता. मी माझ्या पत्नी ला पाणी आणण्यासाठि पिटाळले. तिने आणलेले पाणी ओन्जळित घेऊन मे लाल्याच्य उघड्या जबड्या मधे सोडल. लाल्यचे आचके देणारे शरीर थंड झाल. ओक्सबोक्शि रडणारि मझ्या पत्नीच्या विनवणी ला न जुमानता तो केव्हाच निघुन गेला... जसा अकस्मात तो आला तसाच विजेच्या वेगाने तो निघुन सुद्धा गेला. त्याला वाचवण्याची सन्धि सुद्धा न देता. आमचा लाडका लाल्या गेला.....

मध्यरात्री लाल्याला शेवटचा निरोप देऊन अम्ही परतु लगलो तेव्हा कुठुनशी काळी धावत आली. अमचे हात हुन्गु लागलि. आमचा संयमाचा बान्ध फ़ुटला. लाल्याला ज्या जागी ठेवुन त्याच्या तोन्डात पाणी सोडले ती जागा ती हुन्गु लगली नी ते दृश्य आमच काळिज चिरत गेल. काळजात चर्र झाल. मुके असले म्हणुन काय झाल त्याना का भावना नसतात ? काळी सैरा वैरा धावत होती, तिची नजर भिर्भिरत होती, तोन्डातुन 'कुई कुई' असा आवाज काढुन ती आगतिकपणे आमच्या तोन्डा कडे पहात होती. लाल्याची मघाचि अवस्था पाहुन इकडे तिकडे पळालेलि त्याची भावन्ड आई ला पाहुन तिच्या भोवति गोळा झाली. कदचित माझ्या पयच्य तळव्यावर टपकलेले रक्ताचा वास त्याना आला असवा. झिप्रा नि काळुबाळु हळु हळु नाक फ़ेन्दारत मझ्य आसपास घुटमळुन पुन्हा काळी ला बिलगले. काळी अस्वस्थ पणे येरा झरा घालत होती. मझ्य पयवरील रक्ताचे थेम्ब पुन्ह पुन्ह हुन्गत होति. पुन्ह पुन्ह दुर जऊन ति अमच्य कदे धवत येत होति. आम्हि दोघ मत्र मान खालि घालुन अगतिकपणे तिची अस्वस्थता पहात होतो. तिच्या नजरेला नजर भिडवण्याच धाडस आमच्यात नव्हते. तिला कस आणि कोणत्या भाषेत सान्गु ......लाल्या गेला.
कालची रात्र, माझ्या अजुन पर्यन्त च्या आयुष्यातिल सर्वात भयाण रात्र होती. अन्थरुणात पडलो खरा पण डोळ्यास डोळा लागत नव्हता. कान खाली काळी करत असलेल्या अस्वस्थ 'कुई कुई' चा कानोसा घेत होते. दुसरी कडे माझी पत्नी "तो मरेल रे , वाचव रे त्याला" म्हणुन झोपेतल्य झोपेत अनावर हुन्दके देत होती. पहाटे पहाटे झोप लागली असेल नसेल, लाल्या माझे कान नेहमी प्रमाणे चाटतोय अस वाटल. क्षणार्धात कान चाटणारा लाल्या माझ्या तळहातावर आचके देऊ लागला. मी खडबडुन जागा झालो. हलकेच आवाज न करता मी बाल्कनीत आलो. लाल्याला गाडी ने जिथे चिरडले त्या जागे कडे कितितरि वेळ निरर्थक पहात राहिलो. माझी पत्नी कधि माझ्या मागे येऊन उभी राहिली याचे मला भान नव्हते. माझ्या खान्द्यावरिल तिच्या हातच्या स्पर्शाने मी भानावर आलो. तिच्या खान्द्यावर डोके टेकवुन मी लहान मुला सारखे हुन्दके देऊन कधी रडु लागलो मलाच समजेना.
आज काळी च्या समोरुन जाताना तिच्य नजरेल मी नजर भिडवु शकलो नाहि. न जाणो का पण खुप खुप अपराधि वाटल. अपराधि... मनुष्यप्राणी असल्याबद्दल अपराधि, तिच्या पिल्लाला वाचवु न शकल्या बद्दल अपराधि. मी काहिच न करु शकल्या बद्दल अपराधी, माझ्या 'आगतिकपणा' बद्दल अपराधि.
अजुन पर्यन्त रस्त्यावर अनेक भटक्या कुत्र्याना चिरडुन मरतना पाहिल आहे. क्षणभरात सगळ काहि मी विसरुन जाई. लाल्या च जाण काळजाला घरे पाडुन गेल. एका निरागस जीवाची निरागसता चिरडुन शेवटचे आचके देताना मला पहायला लावुन त्या जगन्नियन्त्याने कसला आसुरी आनन्द मिळवला ते तोच जाणे. मला मात्र एकच गोष्ट समजली..... लाल्या गेला... जाताना अम्हला आमच हरवलेल बालपण परत देऊन गेला. 'रुटिन' च्या चक्रात अडकलेल्या अम्हा यत्किश्चित मनुष्य प्राण्यावर आपार आनन्दाची उधळन करुन आणि जाताना काळजाचा लचका तोडुन ............ लाल्या गेला.........