Followers

Tuesday, September 30, 2008

अंधा कानून

या देशात ज्याला 'न्याय संस्था' किन्वा 'न्यायव्यवस्था' म्हणता येईल अस काहि अस्तित्वात आहे या गोष्टि वरिल विश्वास हळु हळु उडत चालला आहे. काहि खटल्यातील न्याय-निवाडे पाहिल्यास हा संशय द्विगुणित होतो. उदा. गोध्रा कान्ड निकालाचे अहवाल, दोन वेगवेगळ्या व्यक्तिनि दोन वेगवेगळे अहवाल सादर करणे आणि दोन्ही अहवालाचे निष्कर्ष वेग-वेगळे असणे हे म्हणजे अगदिच अतर्क्य आहे. विषेश म्हणजे एकच घटना 'कट' पण आणि 'अपघात' पण कस बुवा असु शकेल याच काहि अस्मादिकान्च्या 'बालबुद्धिला' आकलन होत नाहि. मान्य आहे आम्हि 'सामान्य नागरिक' आहोत. हेहि मान्य आहे कि आदरणिय न्यायालया विषयि मनात आतोनात आदर आहे. पण, लेकिन, किन्तू, परंतु..... हे अस कसं बुवा ? काहि कळत नाहि...

दूसर्‍या खटल्याच्या निकालात "सीमि" ला ज्या प्रकारे 'क्लिन-चिट' देण्यात आली ते पाहुन बसल्या जागी उडालोच. देशभर घडत असलेल्या घातपाती कारवायान्मधे सामिल असलेल्या अतिरेक्यान्चे धागेदोरे कुठे ना कुठे सिमी जवळ येवून मिळतात. ( दररोज वर्तमान पत्रातिल पोलिस तपासाच्या बातम्या तरी तेच सान्गतात.) असे असताना जेव्हा आमचे आदरणीय न्यायमंदिर "सिमीला दहशतवादी संघटना म्हणु नये. ती दहशतवादी संघटना नाही." अस जाहिर करुन तीला 'क्लिन-चिट' देउन मोकळी होते तेव्हा "एत तु ब्रुट्स?" एवढ्च तोन्डी येत.

मान्य बाबा, सिमि दहशतवादि नाहि, संत महत्म्यान्ची संघटना आहे. आता न्यायालयच म्हणते आहे तर पुढे काय? बोलणेच खुन्टले की. पण आम्हाला या धक्क्यातून सावरण्याचा अवधी तरी द्या की राव. त्या आधीच आमच्या आदरणिय उच्च न्यायमंदिर जाहिर करुन मोकळे कि "मराठि भाषे चा अट्टाहासा साठि रस्त्यावर उतरलेले तरुण दहशतवादि आहेत." आता बोला की राव. अहो दातखिळि बसेल नाहि तर काय?

प्रश्न आहे कायदयात नमुद केलेले असुन पण कायध्याचे पालन न करणारे लोक जे न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यास गेले त्याना दहशतवादी का नाहि म्हणायचं ? ज्या सरकारी चाकरानी कायध्याचे काटेकोर पालन करणे टाळले आणि त्या तरुणाना आयतेच निमित्त दिले त्याना दहशतवादी का नाहि म्हणायचं? विशेष म्हणजे, 'सरकारने केलेला कायदा मोडण्या साठि खुशाल न्यायालयाचा दरवाजा ठोठावा' असा (छूपा) संदेश तर न्यायालयाला लोकान्पर्यंत पोहोचवायचा नाही ना? अशी एक आपली शंका मनात घर करतेय.

तर आजकाल हे सगळे निर्णय पाहुन मी अगदि निर्विकार होतो आहे. उद्या जर वर्तमान पत्रा मधे "सूर्य पश्चिमेलाच उगवतो : उच्च न्यायालय" अशी हेडलाईन आली तरीहि मी ती निर्विकारपणेच वाचेन आणि मला ते 'पटेल' सुद्धा, मग मनात कितीही 'पण.....लेकिन...किन्तू....परन्तू' उभे राहिले तरिही. कारण हे सगळ आपल्या 'सामान्य माणसाच्या' आकलना पलिकडच आहे.