Followers

Wednesday, April 2, 2008

सृष्टि चे गाणारे भाट


उन्हाळा सुरु झाला आहे. वातावरण तापते आहे. पण या 'घामाळ' उन्हाळ्यात जर काही आल्हाददायक गोष्ट असेल तर ती सकाळ. नुकताच मी कोकणातील माझ्या गावी जाऊन आलो. आणि येताना कान भरुन तेथिल पक्षान्ची सकाळी चालणारी 'किलबिल' घेऊन आलो. आज पहाटे पहाटे जाग आली आणि थोडावेळ माझा माझ्या कानावर विश्वास बसला नाही. आमच्या घरा समोरील आणि आजुबाजुच्या मोठ्या झाडान्मधे असंख्य पक्षी किलबिल करत होते. त्यात फ़क्त चिमण्याच नव्हत्या, कोकिळ पण अधुनमधुन आपला सुर मिसळुन नव्या ऋतु च्या आगमनाची दवंडी पिटत होते. आमच्या सोसायटिच्या बाजुच्या बंगल्याच्या आवारातिल झाडावर असंख्य चिमण्यान्चा चिवचिवाट चालण हे काही मला नविन नाही, पण आज त्या चिवचिवाटामधे काही नविन आवजाची साथ होती आणि ती एकुणच सगळि किलबिल एक नादमय मंजुळ संगीता सारखी भासत होती. हे सगळ सान्गण्यात विषेश अस की, मी ज्या नविन आवाजा विषयि मी सान्गतो आहे ते आवाज मी कोकणातील माझ्या गावी ऐकलेल्या पक्षान्च्या आवाजाशी मिळते जुळते होते. नवल हे कि ३० वर्षात मी पहिल्यान्दा हे आवाज आमच्या शहरात ऐकतो आहे.

परवाच 'रविवार चा लोकसत्ता' वाचायला हातात घेतो न घेतो तोच समोरच्या उम्बराच्या पानान्मधुन एक वेगळीच शिळ ऐकु आली. पेपर तसाच बाजुला ठेउन बाल्कनीत धावलो तर समोरच्याच फ़ान्दीवर एक चिन्टुकला काळा पक्षी आपली शुभ्र पान्ढरी छाती दिमाखात फ़ुगवुन शिळ घालताना दिसला. शेजारच्या फ़ान्दिवर विनाकारण इकडुन तिकडे उड्या मारणारा त्याच्या सारखाच पण आकाराने थोडा छोटा पक्षी म्हणजे मादी असावी असा अंदाज मी केला. त्याचे ते शिळ घालण आणि तीच अस ठुमकण म्हणजे एकंदरित 'लाईन मारो डॉट कॉम' सुरु होत हे समजण्यास फ़ार वेळ लागला नाही.
हे सारच माझ्यासाठी खुप विलक्षण आहे. कारण गेल्या ३० वर्षात मी पहिल्यान्दा हे सारं आमच्या शहरात अनुभवतो आहे. ट्रेक करत असताना किन्वा गावी रनावनातून तासनतास पक्षान्च्या मागावर फ़िरणे वेगळे आणि इथे बाल्कनीत बसल्या बसल्या असे दुर्मिळ पक्षी बागडताना पाहणे वेगळे.

ही गोष्ट शुभसुचक किन्वा कसे या बद्दल मी संभ्रमात आहे. कारण याची २ कारणे असु शकतात.

१. आमच्या शहरात पक्षान्साठि किन्वा 'स्थलान्तारित पक्षानसाठि पुरेसे सुरक्षित वातावरण किन्वा निवारा लाभतोय.

२. (देव करो नी हे कारण नसो) पक्षान्चे मुळ सुरक्षित निवारे नामषेश होत असवेत, आणि म्हणुन हे पक्षी नाईलाजास्तव शहराकडे फ़िरकत असवेत.

असो, जे असेल ते असेल, सध्या तरी 'आपल्या शहरात पण अशी किलबिल आपण ऐकु शकतो' हे स्वत:ला आणि भेटेल त्याला (वेड्या सारख) सान्गत सुटलोय... चला आता माझ्या सारख्या "सुर्यवन्शी" माणसाला ( म्हणजे सुर्याची किरणे डोक्यावर आल्याशिवाय न उठणारयाला :) ) लवकर उठण्यास भाग पडणार तर...