Followers

Friday, November 6, 2009

पाठित खुपसलेल्या खंजीराची गोष्ट.

ज्या मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसल्याची भाषा बाळासाहेब करत आहेत, त्या मराठी माणसाने तस का केल याच आत्मपरिक्षण करण्याचे कष्ट त्यानी घेतल्याचे दिसत नाहित. पराभव झाल्या बरोबर उलट-सुलट शब्दाचे वार मराठी माणसावर करण्याचे सत्र शिवसेनेने आरंभले आहे. (अर्थात, बाळासाहेबान्चा बोलविता धनी कोणी तरी दुसराच आहे हे १००% नक्की कारण बाळासाहेबानसारखा एक माच्युअर नेता आपल्या मायबाप मतदाराना उद्देशून असे बालीश विधान कधिहि करणार नाही हे त्रिवार सत्य आहे.) पण तस करताना त्यानी मराठी माणसाला काय आपल्या गोठ्यात बान्धलेली गाय समजले आहेत काय? किन्वा जेव्हा 'मराठी माणुस' ही आपली 'व्होट बान्क' मानून चाललेल्या शिवसेनेला आपली ही बान्क शाबुत ठेवण्या साठी काहीही प्रयत्न करावेशे वाटले नाहीत काय? कि शिवसेनेने मराठी माणसाला इतका गृहीत धरला काय कि त्याला स्वत:ची निवड करण्याचा अधिकारच नाही ? असे का? गेल्या १० वर्षात शिवसेनेने मराठी माणसासाठी अस काय भरीव काम केल की त्याची पोच-पावती म्हणून मराठी माणसाने त्याना मते द्यावीत ? गेल्या १० वर्षात मराठी माणसाची सर्वतोपरी पीछेहाट होत असताना शिवसेना काहीच करताना दिसत नव्हती असे का? बर, याच मराठी माणसाच्या मराठी मतान्वर सत्ता प्राप्त केल्या नन्तर शिवसेनेने त्याच मराठी माणसाला वारयावर सोडले होते हे सत्य शिवसेना विसरली काय? तेव्हा लगेच आपण स्थानीक भुमीपुत्रान्च्या हक्का साठी असलेली संघटना आहोत हे विसरुन शिवसेनेची केन्द्रात सत्ता हस्तगत करण्याची महत्वकान्क्षा वाढीस लागून मराठी माणसाला तात्काळ विसरुन 'हिन्दुत्ववादाचा' उदो उदो करण्यास शिवसेनेने सुरवात केली. या दोन दगडावर कसरत करताना शिवसेना आपला मूळ उद्देशच ( भूमिपूत्रान्ची तारणहार) विसरलीच नाही तर तो बाजुलाच ठेवला. असे असताना जर सगळ्याच क्षेत्रात हतबल मराठी माणसाला जर आपली बाजू घेणारा कोणीतरी म. न. से च्या रुपात पर्याय निर्माण झाला आणि त्यानी त्याला त्या बद्दल भरभरुन प्रतिसाद दिला तर त्याल 'पाठीत खंजीर खुपसणे' म्हणून हीणवणार का? याचा अर्थ शिवसेना मराठि माणसाला आपल्या गोठ्यातील गाय समजते. हे अस समजण उचित आहे का ? कदापी नाही. शिवसेने बद्दर उरली सुरली आपुलकी आता संपुष्टात आली आहे. माझ्या पुरत म्हणायच झाल्यास एक मराठी माणुस म्हणून शिवसेनेने मला दुखवला आहे.

.... या पूढे काहीही झाल तरी शिवसेनेनेस माझ मत मी देणार नाही. आणि शिवसेनेने त्याची अपेक्षाही करु नये. अर्थात माझ्या एका मताने शिवसेनेस काही फ़रक पडणार नाही , पण अशी अनेक मतेच मग म. न. से. जीन्केल आणि तसे झाल्यास कोणिही 'आमच्या पाठीत खंजीर खुपसला' असा गळा काढु नये. मला एक प्रसन्ग आठवतो. सेनेच्या कारभारला वैतागुन एक प्रामणिक नेता शिवसेनेतुन बाहेर पडला तेव्हा, आपल्या लाडक्या 'उद्धट काकनी' 'आम्हाला, शिवसेनेला काही फ़रक पडत नाही' अस उद्धट स्टेटमेन्ट दिले. तेव्हा नाना पाटेकर म्हणाले होते. असच जर होत राहील तर मग एक दिवस बाळासाहेब मागे वळून पाहतील तेव्हा त्याना दिसेल कि ते एकटेच उरले आहेत. नानाच वाक्य एवढ्या लवकर खर होईल अस वाटल नव्हत. तेव्हा' 'आमच्या पाठीत खंजीर खुपसला' असा गळा काढणारयानी याचे भान ठेवा. मराठी माणसाला गृहीत धरुन चालण सोडा आता.

2 comments:

Mahendra Kulkarni said...

Good post.. avadale.

साधक said...

बरोबर बोललात. रोखठोक.