
सकाळी सकाळी मला मित्राने वर्तमान पत्र डोळ्यासमोर फ़डकवत २६/११ च्या श्रद्धांजली आणि त्याच्या होणार्या ग्लेमरयजेशन बद्द्ल माझा "व्ह्यू" विचारला आणि सकाळी सकाळी मस्तकात तिडिक गेली. पण सकाळ ची प्रसन्नता ढळू द्यायची नाही असा निग्रह करून मी शक्य तेवढे डोके शांत ठेवत त्याला निरुत्तर केलं.
काय कप्पाळ "व्ह्यू" देणार ? ज्या देशात जनतेच्या मताला किम्मतच नाही, ज्या देशातील जनतेला आपल्या हक्कांची पायमल्ली केली जातेय, आपल्या जगण्याच्या आधिकारावर सरळ सरळ घाला घातला जातोय याची जाणिव नाही, ज्या देशातील जनता स्वत: च्या अस्तित्वावर झालेल्या हल्ल्या चा निषेध स्वत: पेटून उठून रस्त्यावर उतरुन, राजकारण्याना चाबकाने फ़ोडण्या ऐवजी, मेणबत्त्या पेटवून "दिखाऊ चमकोगीरि आणि फ़ालतूगीरी" करणार्या तेवढ्याच "फ़ालतू" भारतीय जनतेला कशावर "व्ह्यू" देण्याचा आधिकारच नाहिये. त्यानी सकाळी उठाव, आज बॉम्ब हल्ल्यात किती मेले ? आपण परत सुरक्षित घरी येऊ ना? अशी काळजी करत घर सोडावं, निमुट कार्यालयात काम करावं, संध्याकाळी जर (ट्रेन मधे बॉम्ब ब्लास्ट झाला नाही तर धक्के खात) घरी परतावं, आणि कुटुंब कबिल्या बरोबर "आज चा दिवस सरला, आज जगलो, आज वाचलो" अशी धन्यता मानत झोपी जावं. वर तोन्डी लावायला महात्म्याच (?) तत्वज्ञान "अन्याय करणार्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो." असं बोम्बलत फ़िराव. विनाकारण "व्ह्यू" कशाला द्यावेत?
२६/११ नंतर गेट-वे जवळ जी मेणबत्त्यान्ची ड्रमेबाजी झाली त्यातील एकाही "चमकोला" पुढिल ३६५ दिवसात असा प्रश्न पडला नाही कि "पुढे काय?". अतिरेक्याना शब्दश: "पोसणार्या" सरकारला त्या दिवशी जमलेल्या विशाल जनसमूहाने एकदाही धारेवर धरलं नाही कि जाब विचारला नाही.
मेणबत्त्या लावून जर दहशतवाद संपला असता आणि मृतात्माना शांती लाभली असती तर हे जग अजूनपर्यन्त नंदनवन झाले असते. २६/११ च्या कसयाला गेट-वे जवळ ज्या दिवशी जाहीर फ़ाशी दिली जाईल तेव्हाच २६/११ च्या मृतान्च्या आत्म्यास शान्ती मिळेल. पण प.पु. बापुन्च्या देशात या जन्मात तरी असे होईल असे वाटत नाही.
उलट त्या अतिरेक्याचे "आज चीकन बिर्याणी" "उद्या तंगडी कबाब" असे 'बालहट्ट' आमचं सरकार ज्या तत्परतेने पुरविते आहे ते पाहून आमच्या जीभेची चव जातेय.
बेछूट गोळीबार करून निरपराध लोकान्चा जीव घेणार्या अतिरेक्यावर आमचं श्रीमंत सरकार दिवसाला ८५ हजार रुपये खर्च करते ते पाहून कधी कधी असे वाटते की सरकार तरुणाना "अतिरेकी बना" असा एक छुपा संदेश देत आहे. या देशात सामान्य माणसाला जगण दुरापास्त आहे पण अतिरेक्याना मान पान आहे. तेव्हा तरुणानो सरकारच्या भावना समजून घेऊया... सरकारच्या इच्छेचा आदर राखुया ..... चला आपणही अतिरेकी बनूया......